आपल्या घराला प्रीमियम आणि लक्झरी लूक देण्यासाठी आपण पडद्याच्या accesories घेतो आपले घर सुंदर आणि लोकांच्या घराहून थोडे वेगळे दिसले पाहिजे त्याच्यासाठी काही पडद्याच्या accesories तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची माहिती तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगणार आहे.
पडद्याच्या धारकांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत
पडदा धारकांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि किती प्रकारचे पडदा धारक असतात त्यांना कुठे वापरायचे ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत:
1. पडद्याचा रॉड (Curtain rod)
Curtain rod हा पडदे टांगण्याचा एक साधन आहे. मुळात या रॉडला भिंतीवर दोन्ही बाजूला बसवले जाते आणि या रॉडचा वापर खिडक्यांवर पडदे बसवण्यासाठी केला जातो.
या पडद्याच्या रॉडचे डिझाइन साधे ते heavy सजावटीचे रॉड मिळतात.
2. पडदा ट्रॅक (Curtain track)
पडद्याच्या ट्रॅकमुळे आपण पडदे सहजपणे बाजूला सरकवू शकतो आणि. या (curtain track) चा वापर मॉडर्न घरांमध्ये केला जातो. कारण हा मॉडर्न प्रकार आहे रॉड बाहेरून दिसत नाही आणि क्लीन लूक येतो मुळात सांगायचे तर याच्यात पडदे hook/runner ने ट्रॅकच्या मध्यभागी चालतात.
3. डबल रॉड (Double Rod) / डबल ट्रॅक (Double Track)
याच्यात दोन प्रकार असतात आणि याचा उपयोग एकाच वेळी दोन पडदे लावण्यासाठी केला जातो. दिवसामध्ये पातळ sheer पडदे आणि रात्री blackout पडदे
4. मोटाराईझ पडदा (Motorized Curtain)
Motorised curtain हा प्रकार प्रीमियम अनुभव देतो कारण या motorized पडद्यांना आपण remote, app, voice comand ne कंट्रोल करू शकतो. आणि हा आपल्याला लक्झरी फील देतो.
5. टायबॅक हूक (Tieback/Hooks)
याचा उपयोग पडद्यांना एका जागेवर व्यवस्थित बांधून ठेवण्यासाठी होतो. याच्यामुळे आपली बेडरूम असो किंवा लिव्हिंगरूम जास्त open आणि clean दिसते. त्यांच्यामुळे घराचा look सुधारतो.
6. होल्डबॅक्स (Holdbacks)
हे घरातले डेकोरेटीव्ह होल्डर असतात आणि holdbacks कायमचे एका जागेवर असतात आणि हे holdbacks पडद्यांना एका जागेवर व्यवस्थित बांधून ठेवण्याचे काम करतात.
7. मॅग्नेटिक पडदा धारक (Magnetic Curtain Holders)
मॅग्नेटिक पडदा होल्डरला लोक यासाठी वापरतात कारण या होल्डर ला बसवण्यासाठी भिंतीत ड्रिलिंग करावी लागत नाही. आणि या मॅग्नेटिक पडदा होल्डच्या दोन्ही बाजूला मजबूत मॅग्नेट्स असतात ज्याच्यामुळे पडद्याला मॅग्नेट घट्ट पकडून ठेवतात. याचा वापर लोक घराला प्रीमियम लूक देण्यासाठी करतात.
पडद्याचा ब्रॅकेट म्हणजे काय
पडदा ब्रॅकेट नेमकं काय काय असतोपडदा ब्रॅकेट हा भिंतीला घट्ट धरून ठेवण्यासाठी चा सपोर्ट असतो आणि या ब्रॅकेटला भिंतीत स्क्रूने बसवला जातो. तो कोणत्या आकाराचा असतो. याचा आकार (L shape) आणि (U shape) अशा दोन प्रकारामध्ये येतो आणि हे मेटल आणि प्लास्टिक चे असतात
पडदा ब्रॅकेटचे प्रकार कोणते आहेत ते खालीलप्रमाणे;
1. वॉल ब्रॅकेट (Wall bracket)
वॉल ब्रॅकेट सगळ्यात सामान्य प्रकार आहे ह्याला भिंतीवर स्क्रूने बसवला जातो.आणि याचा वापर वस्तू ठेवण्यासाठी किंवा वस्तू लटकवण्यासाठी केला जातो आणि हा L आकाराचा असतो.
2.सिंगल ब्रॅकेट (Single Bracket)
नावाप्रमाणेच हा साधा ब्रॅकेटचा प्रकार असून हा L आकाराचा असतो. आणि हा साध्या सेटअप साठी आहे जसे की पुस्तके ठेवण्यासाठी L आकाराची रॅक आणि इतर.
3.डबल ब्रॅकेट (Double Bracket)
हा पण L आकाराचाच असतो पण ह्याच्यात एका ब्रॅकेटमध्येच दोन सपोर्ट असतात आणि याला भिंतीवर बसवतात हा डबल ब्रॅकेट सेटअप ( ब्लॅकआउट आणि शीअर ) आहे माझ्या घरी हा सेटअप मी लावलेला आहे दिवसा शीअर पडदे आणि रात्री ब्लॅकआउट मी प्रमोशन करत नाही खरच हा सेटअप खूप चांगला आहे आणि हा डबल ब्रॅकेट सेटअप मला पर्सनली मला खूप आवडतो. आणि हा माझा रिव्ह्यू आहे डबल ब्रॅकेट सेटअप बद्दल.
4.Adjustable Bracket
Adjustable ब्रॅकेट सेटअप ची आपण उंच ,कोण, लांबी ऍडजस्ट करू शकतो आपल्याला हवे तसे.हा फ्लेक्सीबल सेटअप आहे आपल्या गरजेनुसार आपण जागा वाढवू शकतो किचन, ऑफिस स्टोअरेजसाठी इत्यादी.
जड पडदे टांगण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे
तुम्हाला जर तुमच्या खिडकीला जड पडदे टांगायचे असतील तर तुम्ही पहिले प्लास्टिकचे रॉड टाळा.आणि तुम्ही स्टेनलेस स्टील/ iron रॉड सारखे मजबूत रॉड निवडा कारण वजन पडद्यांना सहन करण्यासाठी मजबूत रॉड लागतो जर का तुमची
खिडकी 4 ते. 5 feet अंतरावर असेल तर तुम्ही किमान 3 ब्रॅकेट तरी लावा खिडकी मोठी असेल तर 4 ते 5 ब्रॅकेट लावा कारण पडद्याचे वजन समान रूपात विभागले जाते. आणि तुम्ही फक्त स्क्रू लावू नका स्क्रू लावला तर ब्रॅकेट सेटअप पडद्याच्या वजनाने खाली पडण्याची शक्यता असते
पडदे सांभाळू शकणार नाही त्याच्यासाठी तुम्ही wall plug आणि rawl plug वापरा याच्याने भिंतीला strong grip मिळते आणि तूम्ही जर तुमच्या खिडकीला शीर आणि blackout पडदे लावणार असाल तर डबल रॉड आणि डबल ब्रॅकेट वापरा
ट्रॅक विचारात घ्या आणि तुमच्या खिडकीचा रॉड लांब असेल तर तुम्ही रॉडच्या extra सपोर्टसाठी रॉडच्या मध्यभागी एक ब्रॅकेट लावा. खिडकीची रॉड लांब असेल आणि रॉडच्या मध्यभागी सपोर्ट नसेल तर पडद्याच्या वजनाने रॉड वाकू शकतो.
Heavy ड्यूटी Wall Mount Bracket वापरा L आकाराचे बळकट ब्रॅकेट घ्या आणि त्या ब्रॅकेटला (75-90) सेमी अंतरावर ठेवा
खिडकी जर 48 उंचावर असेल तर किमान 3 ब्रॅकेट वापरा दोन्ही टोकांना आणि मध्यभागी सपोर्ट ब्रॅकेट वापरा.
जड पडदे टांगण्यासाठी तुम्ही स्क्रू किंवा खिळे वापरू शकता तुम्हाला जर जड पडदे टांगायचे असतील तर ब्रॅकेटला जास्त आधाराची आवश्यकता असते त्याच्यासाठी तुम्ही लांब स्क्रू किंवा लांब खील्याचा वापर करू शकता.
हा चांगला मार्ग आहे कारण अतिरिक्त जड पडद्याच्या लांबीने लास्टरबोर्डमध्ये खोलवर डिस्ट्रिब्यूशन होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या योग्य मापाचे स्क्रू आणि खिळे निवडा.
पडद्यांचे तीन प्रकार कोणते आहेत
बघायला गेलं ना तर पडद्याचे खूप प्रकार आहेत पण. त्यातले मी तुम्हाला 3 पडद्याचे प्रकार सांगतो.
1. शीर पडदा (Sheer curtains)
Sheer पडदा हा खूप पातळ आणि हलका असतो आणि हा पडदा प्रकाशाला आत येऊ देतो. या पडद्याचा वापर हवेशीर वातावरणासाठी हॉल मध्ये आणि लिव्हिंग रूममध्ये केला जातो.
2. ब्लॅकआउट पडदे (Blackout Curtains)
हा पडदा शीर पडद्याहून अलग आहे ब्लॅकआउट पडदा जाड आणि Heavy असतो आणि हा पडदा प्रकाशाला आत येऊ देत नाही प्रकाशाला पूर्णपणे ब्लॉक करतो ह्या पडद्याचा उपयोग privacy साठी केला जातो.
3. कॉटन पडदे (cotton/fabric curtains)
कॉटन पडदा हा जास्त जाड ही नसतो आणि जास्त पातळ ही नसतो हा कुठेही चालतो बजेट फ्रेंडली असतो सगळ्यात साधा प्रकार आहे सिंपल आणि डिसेंट लूक साठी असतो हा पडदा
पडद्याच्या क्लिप्स का वापराव्यात
पडद्याच्या क्लिप्स वापरल्यामुळे आपण पडदे सोप्या पद्धतीने बसवू शकतो कारण पडद्याला थेट क्लिप्सला अडकवून रॉडला लटकवता येतो आणि क्लिप्समुळे आपला वेळ सुद्धा वाचतो.
तसेच पडद्याच्या क्लिप्समुळे आपण पडद्याची लांबी उंची ऍडजस्ट करू शकतो. घरात एखादा कार्यक्रम असेल आणि तुम्हाला वाटले की पडदा बदलावा तर तुम्ही क्लिपसमुळे सहज पडदा बदलू शकता कारण जास्त वेळी jat नाही जलद गतीने काम होऊन जाते.
हे क्लिप्स वापरल्यामुळे पडद्यावर सुंदर दिसणाऱ्या चुण्या पडतात आणि त्या चुण्या खोलीला स्टायलिश लूक देतात
आपण रोजच पडदे उघडतो बंद करतो क्लिप्समुळे पडद्याची हालचाल करणे सोपे जाते.
आपण आपल्या पडद्याची काळजी घेतोच कारण दीर्घकाळ टिकून रहावे म्हणुन क्लिपसमुळे कापडाचे संरक्षण होते नाजूक दर्जाच्या कापडावर ताण कमी येतो आणि कापड फाटण्याची संभावना कमी होते
हे क्लिप्स त्यांना उपयोगात पडतील जे भाड्याच्या घरांमध्ये राहतात कारण यांना कोणत्याही प्रकारच्या ड्रिलिंगची गरज भासत नाही क्लिप्स वापरून तुम्ही रॉडवरचे पडदे बदलू शकता.
कर्टन प्लेट म्हणजे काय
कर्टन प्लेट म्हणजे पडद्याच्या वरच्या बाजूला ज्या ( चुण्या ) पडतात त्यांना कर्टन प्लेट म्हणतात.
या घड्यामुळे पडदा सरळ पडत नाही पडद्याला एक विशिष्ट लाटांसारखा आकार मिळतो आणि ह्याच कारणामुळे खिडकी आणि दरवाजा सुंदर आणि आकर्षक दिसतो.
या घड्यांचे अनेक प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे:
1.पिंच प्लेट
हा प्रकार लोकप्रिय आहे कारण कापडाला वरच्या बाजूस चिमटा लावून शिवला जातो आणि त्याच्यामुळे पडदा खाली छान पसरतो.
2. पेन्सिल प्लेट
पडद्याला पेन्सिलसारख्या बारीक घड्या जवळजवळ पडतात आणि बघितल्या तर पेन्सिल सारख्या दिसतात म्हणुन या प्रकाराला पेन्सिल प्लेट म्हणतात.
3. आयलेट रिंग
ह्या आयलेट पडद्याच्या प्रकारामध्ये पडद्याच्या मधेच रिंग असतात आणि त्यांना डायरेक्ट रॉडमध्ये टाकले जाते
टॉप स्लॉट कर्टन म्हणजे काय
टॉप स्लॉट पडद्याच्या पूर्ण रुंदीभर एक चॅनल पसरलेला असतो म्हणून त्याला टॉप स्लॉट कर्टन किंवा रॉड पॉकेट असेही म्हणतात.
टॉप स्लॉट कर्टनच्या वरच्या बाजूला कापड दुमडून एक पिशवी सारखा भाग शिवलेला असतो. त्यातून आपण टेंशन रॉड, नेट वायर आणि नेट रॉड घालू शकता. याच्यामुळे पडदा दांडीवर सहज टांगता येतो
टॉप स्लॉट पडदे लावल्यानंतर पडद्याच्या वरच्या बाजूला चुण्या तयार होतात आणि त्यामुळे खोली एकदम रिलॅक्स आणि आरामदायक मोकळा अनुभव देते.
विशेष करून यांना हलक्या वजनाचे नेट किंवा व्हॉईल पडद्यासाठी वापरले जातं आणि यांना बसवण्यासाठी कोणत्याही हूकची गरज भासत नाही आणि हे स्वस्त आणि सोपे पडतात.
सध्या पडद्यांचा ट्रेंड काय आहे
सध्या 2026 मध्ये पडद्यांचा ट्रेंड आहे तो नैसर्गिक साहित्य, मिनीमलिस्ट लूक, आणि अर्थी टोन्स चा ट्रेंड आहे लिनेन, कॉटन, आणि लेअरिंग शीर + ब्लॅकआउट आणि शीर टेक्शर पडदे लोकप्रिय आणि ट्रेंडिंगला चालले आहेत.
निष्कर्ष
मला अशा आहे की हा मार्गदर्शक तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला पडद्यांबद्दल चांगली माहिती मिळाली असेल आणि तुमच्या घराला प्रीमियम व लक्झरी लूक देण्यासाठी काही नवीन कल्पना सुचल्या असतील, तर मला खूप आनंद होईल
तुम्हाला आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर webstorys.in वर अवश्य भेट द्या.
ही माहिती तुम्हाला आवडली का?
खाली कमेंट करायला विसरू नका.