आजच्या मॉडर्न जगात curtain Tieback गरजेचे आहेत का

तुम्हाला पण तुमच्या नवीन घरात पडद्याचे टायबॅक लावायचे आहेत का?
जेव्हा पण नवीन घरामध्ये पडद्याचे ॲक्सेसरीज लावायचे म्हटले तर पहिल्यांदा काळतच नाही

डोक कामच करत नाही पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आजच्या या पोस्ट मध्ये पडदे होल्डर ची माहिती सांगणार आहे ते कुठे आणि कसं वापरायचे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे

Types of different curtain tieback

सुरुवातीला मला वाटायचं tieback म्हणजे एकच प्रकार असतो. पण जेव्हा मी घेतले, तेव्हा कळलं की खूप options असतात.

कापडी tieback (same पडद्याचा) साधा आणि safe वाटतो. rope किंवा tassel वाले थोडे fancy दिसतात  guest आल्यावर छान वाटतं

magnetic tieback पण try केला होता, पण honestly सांगायचं तर तो थोडा toy सारखा वाटला

metal hook वाले strong असतात, पण थोडे permanent वाटतात  एकदा लावलं की बदलायला आळस येतो.

उंचीवर प्रयोग

मी पहिल्यांदा random height ला लावले आणि खूप विचित्र दिसत होतं
नंतर थोडं middle ला adjust केलं तेव्हा balance दिसायला लागलं.

एकदा खाली लावून पाहिलं तर थोडं relaxed look येतो.

माझी सूचना एकदा शेवटचा screw मारण्या आधी 2 ते 3 वेळा trial घ्या मी हे न केल्यामुळे मला भिंत पुन्हा drill करावी लागली होती

कोणत्या रूमसाठी उपयोगी आहेत

माझ्या bedroom मध्ये मी tieback लावले तेव्हा feel cozy झाला. सकाळी light आत येतो ते छान वाटतं.

पण living room मध्ये घेतले तेव्हा कळलं की ते जास्त सजावटीसाठीच आहेत रोज वापरायला नाही.

balcony मध्ये तर मी एकदम बंद केलं वारा आला की सगळं उडतं. तिथे साधे पडदे चांगले आहेत

पडदा होल्डरचे फायदे

१.प्रकाश नियंत्रण सोपं होतं

पडदा सरळ सोडला की सकाळी सूर्य उगवताच खोलीत प्रकाश येतो, डोळे चुरचुरतात. होल्डरने बाजूला धरल्यावर पडदा खिडकीच्या बाजूला नीट राहतो, मधे काहीच अडथळा येत नाही. दिवसभर थोडासा प्रकाश हवा असेल तर फक्त एका बाजूला बांधून ठेवतो सकाळी उठल्यावर खिडकी उघडी करायची गरज नाही.

२.खोली मोठी आणि उजळ वाटते

पडदा पूर्ण बंद असला की खोली कोंदट वाटते. होल्डरने दोन्ही बाजूला धरल्यावर पडद्याचे फोल्ड्स सुंदर दिसतात आणि खोलीत जागा जास्त वाटते. विशेषत आमच्या लिव्हिंग रूममध्ये हे खूप कामी आलं  छोटी खोली असूनही एअरी वाटू लागली.

३.पडद्यांचे फोल्ड्स नीट राहतात

पडदा रोज सरकवला की कधीकधी कडा वाकड्या होतात किंवा एकमेकांत गुंततात. होल्डरने बांधून ठेवल्यावर ते व्यवस्थित राहतात किंचितही क्रिझ पडत नाहीत कमीतकमी माझ्या केसमध्ये सकाळी उठून फक्त बांधून ठेवलं की काम झालं.

४.सजावटीत थोडासा बदल

मी साधे पडदे घेतले होते, पण मेटल होल्डर लावल्यावर ते जरा वेगळे आणि क्लासिक दिसू लागले. कधीकधी फक्त रंग बदलूनही नवीन लूक येतो  जसं काळ्या पडद्यावर गोल्डन होल्डर.

कोणत्या पडद्यांसोबत चालतं नाही

हेवी पडदे जसं वेल्वेट असतील तर tieback खूप useful वाटतो  पडदा neat दिसतो.
शीर पडद्यांवर try केलं होतं पण honestly फरक काही खास जाणवला नाही.
Short पडद्यांवर तर awkward दिसतं, तेव्हा avoid केलं मी.

तोटे आणि त्रास

१.बांधणे-उघडणे रोजचा त्रास

सकाळी उघडायचे, संध्याकाळी बंद करायचे हे रोज करावे लागते. कधीकधी हातात धूळ असते किंवा घाई असते तेव्हा फारच इरिटेटिंग वाटतं. विशेषतः जड पडदे असतील तर आणखी कष्ट.

२.काही होल्डर पडद्यावर मार्क सोडतात

कापडी टायबॅक चांगले, पण मेटल किंवा प्लास्टिकचे कडक होल्डर लावले की काही वेळाने पडद्यावर हलके मार्क किंवा दाब पडतो. हलके पडदे असतील तर हे जास्त दिसतं.

३.बाल्कनी किंवा किचनसाठी फारसा उपयोग नाही

आमच्या बाल्कनीच्या पडद्यांसाठी मी ट्राय केलं, पण वारा येतो तेव्हा होल्डर लावले तरी पडदा उडतो. किंवा किचनमध्ये जास्त धूर तेल असल्याने ते लवकर घाण होतात. तिथे फक्त सरळ पडदे चालतात.

४.खूप ऑर्नेट असले तर जास्त दिसतात

काही होल्डर खूप फॅन्सी असतात टॅसल, मोती वगैरे. ते लावल्यावर पडदा कमी आणि होल्डर जास्त दिसतो. साध्या घरात हे ओव्हर वाटतं.

काही चुका ज्या मी केल्या

मी एकदा खूप tight बांधलं होतं नंतर पडद्यावर crease राहिली.
एकदा चुकीच्या height ला लावलं  पुन्हा drill करावं लागलं.
आणि एकदा light पडद्यावर heavy tieback घेतला matchच बसला नाही.

देखभाल हा भाग कुणी सांगत नाही

सुरुवातीला excitement मध्ये घेतलं, पण नंतर कळलं की tieback वर dust पटकन बसतो.
कापडी असेल तर धुवावं लागतं. metal असेल तर थोडा dull दिसायला लागतो.
म्हणजे maintenance कमी आहे, पण zero नाही  हे आधी माहित नव्हतं मला.

खर्च माझा छोटासा अनुभव

मी सुरुवातीला स्वस्त घेतले होते ₹150 च्या आसपास काम चाललं.
नंतर एक decorative घेतला ₹500 चा दिसायला भारी पण रोज वापरायला नाही.
माझ्या मते, simple घ्यायचं आणि जास्त fancy मध्ये पैसे घालवू नयेत.

DIY idea एक जुगाड केला होता

एकदा माझ्याकडे extra dupatta होता मी त्यातून tieback बनवला.
Honestly, तोच मला जास्त आवडला
थोडं creative असशील तर पैसे वाचवूनही छान look येतो.

निष्कर्ष

आपण या आजच्या पोस्ट मध्ये जाणून घेतले की पडदे होल्डर/टायबॅक किती महत्वाचे आहेत आणि ते घरांमध्ये लावले तर त्याचा किती इंपॅक्ट तुमच्या पडद्यावर बघायला भेटतो अशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल

माझा हा पोस्ट तुम्हाला माहिती देणारा वाटला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका

हे माझ्या खऱ्या अनुभवावरून लिहिलेलं आहे, कुठलंही प्रोडक्ट किंवा ब्रँड प्रमोट केलेलं नाही. फक्त विचार.

1 thought on “आजच्या मॉडर्न जगात curtain Tieback गरजेचे आहेत का”

Leave a Comment