Best Curtain for Summer in India

उन्हाळी पडदे हे फक्त स्टाईलचा पर्याय नसतो तो घराच्या आतील भागात थंड वातावरण ठेवतो आणि तुमच्या घरात विजेचा बिल कमी करण्यासाठी मदत करतो तुमच्या फर्निचरला सुद्धा सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित ठेवतो

या पोस्ट मध्ये तुम्हाला उन्हाळ्यात लोकप्रिय पडद्याचे प्रकार सांगणार आहे कोणते पडदे उन्हाळ्यात तुम्हाला आरामदायक अनुभव देतील अशा पडद्याची लिस्ट तुम्हाला या लेखात माहीत होणार आहे

उन्हाळ्यात लोकप्रिय असलेले दोन पडदे

1.क्राफ्टाइल्सचे सुती पडदे

क्राफ्टाइल्सचे पडदे सूती कापड असल्याने उन्हाची तीव्र उष्णता शोषून घेत आणि हवा खेळती असल्याने घरात थंड वातावरण राहते. या पडद्यांना नैसर्गिक रंग आणि कॉटनने बनवले जाते या क्राफ्टाईल पडद्याचा ब्रँड म्हणून जयपूर ला ओळखले जाते कारण हे ठिकाण हँड ब्लॉक प्रिंटिंग कलेसाठी प्रसिद्ध आहे.

2.लिननचे पडदे

लिनेन पडद्याचं खास गोष्ट म्हणजे ते वजनाने हलके आणि ओलावा शोषून घेणारे असतात. उन्हाळ्यात घराला सुंदर आकर्षक लुकसाठी लिनेन पडदे पातळ पडद्यासोबत पण भारी दिसतात. लिनेन नैसर्गिक कापडाने बनलेले असल्यामुळे चांगले व्हेंटिलेशन आपल्या मिळते हा पडदा 100% ताग आणि कापसाच्या मिश्रणाने बनलेला असतो आणि हा टिकाऊ कापड असल्याने धुवायला सोपे जाते मी माझ्या रूम मध्ये लावलेले आहेत

उन्हाळ्यात तुम्हाला हे 7 प्रकारचे पडदे आरामदायक अनुभव देतील

1.सुती पडदे

उन्हाळ्या ऋतूत सुती पडदा आपल्याला गोपनीयता आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. हे सूती कापड मऊ, टिकाऊ आणि हवादार असते घरात हवा खेळती ठेवते उन्हाळ्यात हा पडदा आदर्श ठरतो. जर घरातला आतील भाग थंड ठेवायचा आहे आणि सूर्याच्या किरणांची प्रखरता आणि उष्णता रिफ्लेक्ट करायची असेल तर सुती पडदे उन्हाळ्या ऋतूत आदर्श ठरतात.

2.प्रकाश गाळणारे पॉलिस्टर पडदे

उन्हाळ्यात पॉलिस्टर पडदे कडक सूर्याच्या प्रकाशाला सौम्य करतो हे पडदे पॉलिस्टरने बनवले जातात आणि टिकाऊ असल्यामुळे दीर्घकाळ टिकतात मशीनने धुण्ययोग्य असतात या पडद्याचे चांगली गोष्ट म्हणजे दिवसामध्ये अस्पष्टता असते गोपनीयता राखली जाते तरी सुद्धा जास्त काही अंधार होत नाही

3.बांबू मिश्रणाचे पडदे

बांबूचे फायबर कापडात मिसळून तयार केलेले बांबू मिश्रित
पडदे टिकाऊ आणि मजबूत असतात आणि हे दीर्घकाळ टिकणारी वस्तू आहे हे पडदे प्रकाशाला पूर्ण ब्लॉक करत नाही आणि घरात थंड वातावरण निर्माण करते.बांबूचे पडदे पूर्णपणे बांबूचे बनलेले नसतात त्यांना इतर फायबर जसे की ( कॉटन, लिनेन पॉलिस्टर) अश्या मिश्रणाने बनवले जातात.

4.पेस्टल रंगाचे थर्मल पडदे

पेस्टल रंगाचे थर्मल / ब्लॅकआउट पडदे सूर्याच्या किरणांची उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे घरात तापमान बॅलन्स राहते.आणि या पडद्याचा वापर आता मॉडर्न घरांमध्ये केला जातो आणि हे पडदे आता ट्रेडिंगला आहेत कारण हे पडदे बाहेरची उष्णता आत येऊ देत नाही आणि (AC) ची थंड हवा बाहेर जाऊ देत नाही त्याच्यामुळे घरात थंड वातावरण राहते

5.सुती जॅकवर्ड पडदे

उन्हाळ्यात जर पडदे घेत असाल तर पातळ सुती जॅकवर्ड पडदे उन्हाळ्यात चांगला पर्याय ठरू शकतो कारण पातळ कापडामुळे पडद्याजवलची हवा खेळती राहते त्याच्यामुळे घरातली अथवा खोलीतली उष्णता नियंत्रणात असते उन्हाळ्यात हलके जॅकवर्ड पडदे चांगले आहेत जर जाड जॅकवर्ड पडदे घेतले तर घरातली उष्णता बाहेर जाणार नाही आणि जाड जॅकवर्ड पडदे हवा खेळती ठेवत नाही त्याच्यामुळे घरात उबदार वातावरण निर्माण होऊ शकते

6.दुहेरी थराचे पारदर्शक पडदे

याच्या नावाप्रमाणेच याच्यात दोन प्रकारचे पडदे असतात शीर पडदा दिवसा प्रकाश घरात आत येण्यासाठी आणि ब्लॅकआउट पडदा तुमच्या गोपनीयतेसाठी वापरू शकता हा पण गर्मी कमी करण्यासाठी मदत करतो मॉडर्न घरांमध्ये याचा वापर केला जातो

7.प्रकाश रोखणारे लिनन मिश्रित पडदे

हे पडदे लिनेन मिश्रित पडदे असल्यामुळे हवेशीर असतात आणि या पडद्यावरची ब्लॅकआउट कोटिंग (UV) रेज रोखतात हे पडदे ज्या खोल्यांमध्ये जास्त सूर्याची किरणे येतात त्या खोल्यांसाठी चांगला पर्याय आहे.

निष्कर्ष

आशा करतो की या छोट्या लेखात तुम्हाला 7 प्रकारच्या पडद्याविषयी माहिती भेटली असेल अशा करतो की हा पोस्ट तुमच्या साठी उपयुक्त ठरला असेल

या पोस्ट मध्ये आपण बघितलेकी उन्हाळ्यात योग्य प्रकारचे पडदे निवडले तर आपल्या घराचे वातावरण थंड आणि आरामदाय राहते

हा ब्लॉग वाचून तुम्हाला काय वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका

1 thought on “Best Curtain for Summer in India”

Leave a Comment