Block Print Curtain: कमी खर्चात घर सुंदर बनवण्याचे Secret Tips

ब्लॉक प्रिंट पडदे आपल्या घराचे वातावरण बदलू शकतात का? Block Print Curtain सूती कापडाने बनलेले असल्यामुळे घरात हवा खेळती ठेवतात आणि उन्हाळ्यात घराचे वातावरण थंड आणि बॅलन्स ठेवण्यास मदत करतात

या ब्लॉग पोस्ट आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला ब्लॉक प्रिंट पडद्याबद्दल आवश्यक माहिती मी तुम्हाला देणार आहे

ब्लॉक प्रिंट पडदे नेमके काय असतात?

हाताने लाकडी ब्लॉक ठोकळ कोरून त्यांना नैसर्गिक रंगात बुडवून कापडावर हळूहळू छापले जातात.

प्रत्येक ब्लॉक वेगळा असतो, म्हणून प्रत्येक पडद्यात छोट्या छोट्या फरक दिसतात कधी रंग थोडा जास्त गडद कधी डिझाइनमध्ये हलकीशी असतात.

हे मशीन प्रिंटसारखे बिलकुल परफेक्ट नसतात पण त्यात जीव असतो.

बहुतेक वेळा सुती किंवा लिनेनवर बनवले जातात आणि रंगही वनस्पतीजन्य किंवा मिनरल्सपासून.

Block print curtain घर सजवण्यासाठी खरंच worth आहेत का?

मी आधी पडदे घेताना फार विचार करत नव्हतो. दुकानात जे चांगले दिसले ते घेतले आणि बस. पण एकदा मित्राच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घरात block print पडदे पाहिले काहीतरी वेगळंच feel होत होते. खूप भारी नाही, पण simple असूनही लक्ष वेधून घेत होते.

तेव्हा curiosity आली आणि मीही try करून पाहिलं.

पहिल्या दिवशीच एक गोष्ट लक्षात आली  हे पडदे फक्त खिडकी झाकायला नसतात ते घराचा mood बदलतात.

मला personally काय आवडलं

सगळ्यात आधी प्रत्येक पडदा unique वाटतो.
माझ्या बेडरूममध्ये light रंगाचा पडदा लावला, आणि खोली जरा मोठी वाटायला लागली. हे मी expect केलं नव्हतं.

दुसरी गोष्ट घराला थोडा Indian touch येतो.
आधी माझं setup खूप plain होतं, पण हे पडदे लावल्यानंतर थोडी warmth आली. कोणीही घरी आलं की हे पडदे कुठून घेतले हा प्रश्न almost fix असतो

आणि honestly सांगायचं तर, जास्त expensive नसूनही premium feel देतात.

ब्लॉक प्रिंट पडद्याचे फायदे जे खरेच जाणवतात

मी जेव्हा हे पडदे लावले तेव्हा काही गोष्टी लगेच लक्षात आल्या.

१.प्रत्येक पडदा अनोखा

मित्रांच्या घरी गेलो तर तेच डिझाइन दुसऱ्याकडे नाही, हे खूप छान वाटतं. हाताने बनवलेलं असल्याने ते युनिक राहतं.

२.घराला भारतीय स्पर्श

फ्लोरल, जाली, किंवा ज्यामेट्रिक पॅटर्न असतात, ज्यामुळे खोलीत एक सांस्कृतिक वातावरण येतं. प्लेन पडद्यांपेक्षा हे जास्त बोलके असतात.

Block print curtain

३.टिकते चांगली

मी चांगले दर्जाचे कापड निवडले आणि माझ्या कापडाला आता २वर्षे झाली अजूनही रंग पहिल्या सारखाच आहे.कापडाची चांगली देखभाल केली तर कापड५ ते ६ वर्षे टिकू शकतात.

४.प्रकाश आणि गोपनीयता

हलके असले तरी सूर्यप्रकाश छान फिल्टर करतात, आणि सकाळी त्यातून पडणाऱ्या सावली खूप सुंदर दिसतात.

५. पारंपारीक कामगिरी

एका छोट्या गावातल्या कारागिराकडून घेतले होते, त्याने सांगितलं की प्रत्येक ब्लॉक १०-१५ वर्षे वापरतात, म्हणजे कापड बदललं तरी डिझाइन तसंच राहतं.

काही त्रास जे सांगायला हवेत

सगळं काही परफेक्ट नसतं, हेही तसंच आहे.

१.रंग ओसरू शकतात

थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ ठेवल्यास किंवा वारंवार धुतल्यास नैसर्गिक रंग फिकट पडतात. मी एकदा चुकीने मशीनमध्ये टाकले, थोडे ओसरले.

२.किंमत जास्त

हातकाम असल्याने १५००-४००० रुपये प्रति पॅनल सहज पडतात, मशीन प्रिंटच्या तुलनेत जास्त.

३.काळजी घ्यावी लागते

हलक्या हाताने हाताने धुणे, सावलीत वाळवणे. ड्राय क्लीन चांगलं, पण तेही महाग.

४.मॉडर्न घरात जुळवणे

घर पूर्ण व्हाईट ग्रे मिनिमल असेल तर हे पडदे जरा जास्त ट्रॅडिशनल वाटू शकतात. मी मिक्स केलंय  एका बाजूला ब्लॉक प्रिंट, दुसऱ्या बाजूला प्लेन.

पडदे घेताना मी काय शिकलो

पहिल्यांदा मी फक्त design बघून घेतले… आणि थोडी चूक झाली

नंतर लक्षात आलं:

  • खूप dark रंग घेतला तर room heavy वाटतो
  • fabric important आहे  cotton किंवा linen जास्त natural वाटतं
  • size चुकला तर सगळा look बिघडतो

आता मी curtain घेण्याआधी window measure करतो, आणि sunlight किती येते तेही बघतो.

एक मोठी चूक जी तू टाळू शकतोस

मी सुरुवातीला lining घेतली नव्हती.

सकाळी sunlight थेट आत येत होता आणि print थोडा dull वाटत होता. नंतर lining लावली तेव्हा फरक जाणवला.

साफसफाईबद्दल माझा अनुभव

मी हे पडदे washing machine मध्ये टाकले नाहीत.
हाताने हलक्या साबणाने धुतले, आणि direct सूर्यप्रकाशात वाळवले नाही.

थोडी काळजी घेतली तर हे 2-3 वर्ष easily चालतात.

कसे निवडावेत आणि वापरावेत?

कापडाची निवड करताना कापड लिनेन किंवा कापसाने बनवलेला असावा. तसेच रंग छाटून बघा. नैसर्गिक वाटला तरच घ्या कारण खोलीच्या आकारमानानुसार लिव्हिंग रुमसाठी थोडे जाड व मोठे पॅटर्न हे बेडरूम साठी हलके आणि शांत रंग चांगले असतात

मी माझ्या बाल्कनीच्या पडद्यांसाठी ब्लॉक प्रिंट घेतलाय, संध्याकाळी वारा येतो तेव्हा ते हलकेच हलतात आणि खोलीत एक छान वास येतो  कापडाचा नैसर्गिक वास येतो.

निष्कर्ष

या ब्लॉग पोस्ट आर्टिकलच्या माध्यमातून आपण जाणून घेतले की ब्लॉक प्रिंट पडद्याची काळजी आणि देखभाल कशी घ्यावी आणि त्याचे फायदे त्रास आणि ब्लॉक प्रिंट पडदे कसे निवडावे हे या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती करून घेतले

हा ब्लॉग पोस्ट वाचून तुम्हाला काय वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आणखी पडद्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

1 thought on “Block Print Curtain: कमी खर्चात घर सुंदर बनवण्याचे Secret Tips”

Leave a Comment