7 best living room curtain design for 2026

तुमच्या living room साठी पडदे हवे आहेत का?

Living room तुमच्या घराचा पहिले इंप्रेशन असते त्याच्यामुळे योग्य living room चे पडदे निवडले तर तुमच्या घराचा लूक खूप इन्हान्स होवू शकतो

आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत की living room साठी पडदे का महत्वाचे आहेत त्याचे फायदे प्रकार तुम्हाला या लेखात सांगणार आहे

Living room मध्ये पडदे का महत्वाचे असतात

Living room मध्ये पडदे लावण्याचा फायदा म्हणजे दिवसामध्ये अस्पष्टता निर्माण करते बाहेरील लोक आतमध्ये बघू शकत नाही त्याच्यामुळे घराची गोपनीयता राखली जाते

दुपारच्या वेळेत सूर्याची तीव्र उष्णता घरात येऊ देत नाही आणि हिवाळ्यात घरातली उब बाहेर जाऊ देत नाही.

धुळीपासून संरक्षण करतात त्याच्यामुळे घरातली वस्तू फर्निचर कार्पेट इत्यादी. धुळीपासून त्यांचा बचाव होतो

पडदे जड असल्यामुळे बाहेरील गाड्यांचा आवाज कंट्रस्शनचा गोंगाट काही प्रमाणात कमी करण्यासाठी मदत करतात

Living room साठी पडद्यांचे प्रकार

1.शीर पडदा

living room curtain design

शीर पडदा सूर्यप्रकाश पूर्णपणे ब्लॉक करत नाही कारण हा पडदा पातळ असल्यामुळे खोलीत हवा खेळती ठेवतो आणि घरात मोहक आणि मऊ असे वातावरण निर्माण होते. या शीर पडद्याला पारदर्शक कापडापासून बनवले जाते हेच कारण आहे की ते प्रकासाला पूर्ण ब्लॉक करत नाही

2.ब्लॅकआउट पडदा

ब्लॅकआउट पडदा हा प्रकाशाला पूर्णपणे ब्लॉक करण्यासाठी उपयोगी आहे कारण हा पडदा जाड असतो आणि याला पॉलिस्टर पासून बनवले जाते ब्लॅकआउट पडदे दिवसा 99% सूर्याच्या प्रकाशाला घराच्या आतमध्ये यायला रोखतो ब्लॅकआउट पडदा तापमान बॅलन्स ठेवते बाहेरचा आवाज नियंत्रणात ठेवतो प्रायव्हसी देतो आणि फर्निचरचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतो

3.लिनन पडदा

लिनन पडदे घराला एक नैसर्गिक मिनीमलिस्ट आणि क्लासी लूक देतात हे पडदे खूप लोकप्रिय आहेत आणि लिनन पडदे उन्हाळ्यात चांगला पर्याय मानला जातो आणि या पडद्याला (Flax) नावाच्या वनस्पतीपासून बनवले जाते त्याच्यामुळे लिनेन पडदा पर्यावरणासाठी पुरक आहे

4.कॉटन पडदा

कॉटन पडदा हा भारतीय घरामध्ये वापरला जाणारा पडदा आहे कॉटन पडदा नैसर्गिक कापडापासून बनलेला आहे त्याच्यामुळे आपल्या त्वचेसाठी हा पडदा सुरक्षित आहे कॉटन पडदा भारतीय हवामाना साठी उपयुक्त ठरतो कारण कापूस सूर्याची प्रखर उष्णता शोषून घेतो कारण हे पडदे जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळ ही नसतात त्याच्यामूळ घरात हवा खेळती राहते तसेच कॉटन पडद्याची देखभाल करणे पण सोपे असते

5 वेल्वेट पडदा

बेसिकली वेल्वेट पडदा मऊ असतो आणि घराला लक्झरी लूक देण्यासाठी वेल्वेट पडद्याचा वापर करतात या पडद्याला राजेशाहीचा पडदा म्हणून ओळखले जाते यो पडदा जाड असल्यामुळे हिवाळ्यात हा पडदा चांगला पर्याय ठरतो कारण बाहेरची थंड हवा आत येत नाही आणि आतमध्ये उबदार वातावरण असते कापड जाड असल्यामुळे प्रायव्हसी मिळते आणि बाहेरचा गाड्यांचा आवाज नियंत्रणात ठेवतो

6.प्रिंटेड पडदा

प्रिंटेड पडद्यावर सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या फुलांच्या पानांच्या नक्शा असतात त्याच्यामुळे घराला नैसर्गिक व उस्ताही लुक देते प्रिंटेड पडद्यामध्ये ब्लॉक प्रिंट,इकत आणि कमलकारी, पैठणी अश्या डिझाइनचा समावेश आहे. हे सर्व पडद्याचे प्रकार घराला भारतीय संस्कृतीचा टच देतात

7.लेयर्ड पडदा ( शीर + ब्लॅकआउट )

लेयर्ड पडद्यामध्ये शीर आणि ब्लॅकआउट पडदा एकाच खिडकीवर बसवले जातात शीर पडदा दिवसा प्रकाश घरात येऊ देतो शीर पडद्यातून घरातून बाहेरचे बघू शकतो पण बाहेरची लोक घराच्या आतमध्ये बघू शकत नाहीत ब्लॅकआउट पडदा पूर्णपणे प्रायव्हसी साठी उपयुक्त ठरतो कारण हा पडदा जाड असल्यामुळे पडदा ओढला की पूर्ण खोली किंवा घरात अंधार होतो लेयर्ड पडद्याला बसवण्यासाठी डबल ब्रॅकेट सेटअप चा वापर केला जातो

How to Choose the Best Curtain

खोलीच्या आकारानुसार

खोली जर लहान असेल तर फिकट रंग आणि हलके कापड निवडा कारण त्याच्यामुळे खोली मोठी दिसते आणि हवेशीर वाटते.

मोठ्या खोलीला तुम्ही गडद रंग आणि ठळक प्रिंट वापरू शकता याने खोली उबदार वाटते

रंगाची निवड ( light Vs Dark )

Light color ( पांढरा, क्रीम पेस्टल )

तुमच्या खोलीत नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी येत असेल तर तुम्ही तिथे फिकट रंग वापरा कारण की हे रंग शांतता देतात

Dark color ( नेव्ही ब्लू , मरून, डार्क ग्रे )

हे रंग ज्या खोलीत जास्त सूर्यप्रकाश येतो तिथे वापरावेत कारण गडद रंग ड्रामा आणि लक्झरी लूक देतात

कापडाची निवड हवामानानुसार

उन्हाळ्यात सुती पडदे आणि लिनन चे पडदे वापरा कारण हे पडदे उन्हाळ्यात उष्णता शोषून घेतात व हवा खेळती ठेवतात

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात वेल्वेट नाही तर जाड पॉलिस्टर वापरा कारण की बाहेरची थंड हवा आतमध्ये येऊ देत नाही आणि घरात उबदार वातावरण ठेवते

लांबी आणि स्टाईल फ्लोअर lenght vs Short

फ्लोअर लांबी चे पडदे जमिनीला टच करतात आणि दुसरा प्रकार जमिनीपासून अर्धा इंच वर असतात आणि हे पडदे हॉल किंवा रूम मध्ये चांगले दिसतात त्याच्यामुळे खोली दिसायला अधिक उंच वाटते

शॉर्ट लांबीचे पडदे खिडकीच्या चौकटीच्या खालच्या बाजूला असतात आणि ते स्वयंपाकघर आणि बाथरूमसाठी वापरले जातात

Rod & fitting tips

पडद्याच्या रॉडची उंची 4 ते 6 इंच वाढवली की खोली मोठी दिसते आणि खोलीला एक आलिशान लुक येतो

खिडकीच्या दोन्ही बाजूंची रुंदी किमान 3 ते 6इंच लांब ठेवा कारण त्यामुळे खिडकीची कच पूर्ण ओपन राहील आणि सूर्याचा प्रकाश जास्त आतमध्ये येईल

साध्या चुका ज्या टाळल्या पाहिजेत?

खूप जास्त डार्क कलर निवडणे

जर का तुम्ही खूपच जास्त डार्क कलर निवडाल तर जास्त डार्क कलर्स सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे तुमची खोली किंवा घरात उष्णता वाढते तसेच डार्क कलर्स चे पडदे उष्णता शोषून घेतल्यामुळे त्याच कलर पण फिकट होतो त्यामुळे जास्त डार्क कलर टाळा

हे डार्क कलर चे पडदे मोठ्या खोल्यांमध्ये आणि हाय सीलिंग असलेल्या ठिकाणी वापरा

चुकीचा आकार/साईझ

जर तुम्ही साईझ निवडायला चुकले तर आखूड पडदे घराला एक अपूर्ण लुक देतात व त्याच्यामुळे भिंतीची उंची दिसायला कमी वाटते

ऋतूंनुसार चुकीचे कापड

उन्हाळ्यात तुम्ही वेल्वेट सारखा जड पडदा निवडला तर ही तुमची मोठी चूक ठरू शकते कारण वेल्वेट पडदा जाड असल्यामुळे तो उष्णता धरून ठेवतो त्याच्यामुळे खोलीत उष्णता निर्माण होते आणि हिवाळ्यात फक्त शीर पारदर्शक पडदा वापरला तर थंडी रोखली जाऊ शकत नाही

ऋतूनुसार पडदे बदला नाही तर लेअरिंग ( शीर + जाड कापड करा त्याच्याने वर्षभर सोईचे पडेल

फक्त स्टाईलवर लक्ष देणे

फक्त स्टाईल वर लक्ष केंद्रित करू नका त्या पडद्याचे प्रमुख वैशिष्ट्यं काय आहे त्याच्याकडे बघा ते पडदा प्रायव्हसी देखभालीसाठी कसा आहे प्रकाश नियंत्रण अशा त्याच्या की फिचर्स कडे लक्ष केंद्रित करा

Best Curtain Recommendation

खाली मी बेस्ट पडद्याची यादी दिली आहे

Style + Light → sheer curtain

Full privacy → Blackout curtain

bugget → cotton curtain

Premium look → Line/velvet curtain

All in one → Layered curtain

हे कुठले पण प्रॉडक्ट सीलिंग नाही तर मी रिसर्च करून आणि मगच तुम्हाला मी suggest केले आहे

निष्कर्ष

मी या पोस्टमध्ये 7 प्रकारचे living रूमसाठी पडदे पडदे का महत्वाचे आहेत साध्या चुका ज्या टाळाव्यात आणि कोणते बेस्ट पडदे आहेत ऋतूनुसार ती सगळी माहिती या पोस्टमध्ये दिली गेली आहे

तुम्हाला हा पोस्ट वाचून काय वाटले तुमचा ओपिनियन कमेंट करून सांगा

Leave a Comment